विहिरीत बुडाल्याने युवकाचा मृत्यू;  अमडापूर येथील घटना...

 
अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विहिरीत बुडाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली.प्रशांत रमेश शिंदे (वय २५, रा.वरखेड, ता. जाफराबाद)असे मृतकाचे नाव आहे.
अमडापूर शिवारात मका पीक असल्यामुळे  महेश विजय पल्लाड व प्रशांत रमेश शिंदे हे ४ नोव्हेबर रोजी रात्री रखवालीसाठी शेतात मुक्कामी गेले होते. परंतु रात्रीच्या सुमारास झोपलेले असतांना प्रशांत शिंदे शेतात दिसून आला नाही. विहिरीच्या काठावर प्रशांतची चप्पल दिसून आल्याने त्यांने विहिरीत उडी मारल्याचा संशय आला.  सकाळच्या सुमारास मोटर पंप चालू करून पाणी काढले असता सकाळी ९ च्या सुमारास विहिरीतील तळाशी प्रशांत शिंदे बेशुद्ध अवस्थेत आढळला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी विजय पल्लाड रा. अमडापूर यांनी पो.स्टे. ला फिर्याद दिली.पुढील तपास अमडापुर ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.