अवघा महाराष्ट्र शोकसागरात!  उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; बारामतीत आज सकाळी झाला अपघात...

 
बारामती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): ही बातमी लिहिताना हात थरथरत आहेत.. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज,२८ जानेवारीच्या सकाळी बारामतीत हा विमान अपघात झाला. विमान लँडिंग करतेवेळी हा अपघात झाला, विमानाला अचानक आग लागल्याने विमानात असलेल्या अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 
जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्ताने बारामतीत आज सभा होती.यासाठी अजित पवार विमानाने बारामतीत आले, बारामती विमानतळावर लँडिंग करतेवेळी विमानाला अचानक आग लागली.. विमान जमिनीवर कोसळले. अपघातानंतर लगेच मदत कार्य राबवण्यात आले, मात्र अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून आणि अर्थमंत्री म्हणून अजित पवारांवर जबाबदारी होती. काका शरद पवारांपासून वेगळे होत त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी गट स्थापन केला होता..