लव्ह–सेक्स –साखरपुडा एकीसोबत! लग्न दुसरीसोबत!  देऊळगावराजात महिलेने सांगितली पोलिसांना आपबीती...

 
देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगावराजात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांसमोर आपबिती कथन केली. अखेर पोलिसांनी केतन गिरणीवाले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आमिष, लग्नाच्या आणाभाका नंतर शारीरिक उपभोग ..साखरपुडा एवढ होऊनही केतन गिरणीवाले याने मात्र लग्न दुसरीसोबत केले असा हा घटनाक्रम आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देऊळगावराजा शहरातील एका महिलेने यासंदर्भात तक्रार दिली. पीडित महिला ४० वर्षांची आहे. तक्रारीनुसार आरोपीने महिलेला आधी लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जून २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या काळात प्रेमात शारीरिक संबंध ठेवले. साखरपुडाही केला. मात्र लग्नाचे आश्वासन पूर्ण न करता आरोपीने दुसरीसोबत लग्न केले असा आरोप तक्रारीत आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून देऊळगाव पोलिसांनी आरोपी केतन पद्माकुमार गिरणीवाले (रा.जुना जालना रोड, देऊळगावराजा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास ठाणेदार ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत..