मलकापूरात लव्ह जिहाद? तरुण–तरुणी बस स्टँडवर आले अन्...बेदम चेपा–चेपी! नेमकं काय घडलं.. खरंच लव्ह जिहाद की?
मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील एक विवाहित तरुण आणि एक अविवाहित तरुणी काही सहकाऱ्यांसह रविवारी दुपारी सुमारे १:४५ वाजण्याच्या दरम्यान मलकापूर बसस्थानक परिसरात आले होते. वेगवेगळ्या समाजातील तरुण-तरुणी एकत्र असल्याचे पाहून काहींना संशय आला. यानंतर ही माहिती काही संघटनांशी संबंधित युवकांपर्यंत पोहोचली.
संशयाच्या आधारावर काही युवकांनी संबंधित तरुणाला अडवत त्याच्याशी हुज्जत घातली आणि त्यानंतर मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरल्याने बसस्थानक परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संबंधित तरुण-तरुणीचे पालक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही कुटुंबीयांनी मध्यस्थी करत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. अखेर परस्पर सामंजस्याने प्रकरण मिटविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून, कोणत्याही अफवा किंवा संशयावरून कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे.