चोरट्यांची हिंमत बघा;चक्क पोलिसादादाची दुचाकी त्याच्या राहत्या घरातून पळवली!
Updated: Jul 30, 2024, 19:04 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चक्क चोरट्यांनी पोलीसाची दुचाकी त्यांच्या राहत्या घरातून पळवल्याची धक्कादायक घटना शेगाव येथील गोलखेड रोडवरील सावता माळी नगरात उघडकीस आली आहे.
Advt👆
भागवत रामराव काकडे (३५) रा.शेगाव (सावता माळी नगर) यांनी 28 जुलै रोजी त्यांच्या राहत्या घराच्या कंपाउंड मध्ये त्यांची दुचाकी क्रमांक एम एच २८ एजी ५५०१ किंमत अंदाज (५०हजार रुपये) उभी केली होती. मात्र २९ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काकडे हे बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी त्या जागेवर दिसून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र मिळाली नाही. आपली दुचाकी कोणीतरी लंपास केली आहे.याची जाणीव झाल्यावर याप्रकरणी भागवत काकडे यांनी अशी तक्रार शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय करुटले करीत आहेत.