रात्रीस खेळ चाले! किनगाव राजा पोलीस हैराण; जनता परेशान....
या प्रकारात एकाच वेळी चार दुकाने फोडण्यात आली असून अंदाजे ६४ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे. काही दुकानांच्या शटरचेही नुकसान झाले आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात यापूर्वीही किरकोळ चोरीच्या घटना घडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. स्थानिक व्यापाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविणे, संशयितांवर लक्ष ठेवणे आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक प्रभावी कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे