सोन्याची चैन लंपास करणारा 'एलसीबी'च्या जाळ्यात ! आरोपी जळगाव खान्देशचा !!     

 
 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):चालू वर्षाच्या प्रारंभी मलकापूर शहरातून सोन्याची चैन लंपास करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. त्याच्याकडून गेलेला मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.

 प्रीतम अविनाश बऱ्हाटे (वय 21 वर्ष, राहणार जळगांव खान्देश) असे आरोपीचे नाव आहे. त्याने मागील 29 जानेवारी 2024 रोजी मलकापूर शहरातून सोन्याची चैन हिसकावून पळ काढला होता. प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास एलसीबी कडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे , अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी, अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे मार्गदर्शनात पथकाने तपास सुरू केला.

चैन स्नॅचिंग मधील आरोपीचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपी निष्पन्न झाला. 
काल, 25 सप्टेंबर रोजी आरोपी प्रीतम याला अटक करण्यात आली.त्याच्या कडून 6.150 ग्राम सोन्याची गोल गोळी (किंमत 34 हजार रुपये) जप्त करण्यात आली आहे.
 एपीआय रुपेश शक्करगे  
एएसआय गजानन माळी  
पोलीस हवालदार चांद शेख अनुप मेहर, नायक पोलीस गणेश पाटील, चालक  
हवालदार शिवानंद मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.