कर्नाटकातील चित्रपट निर्मात्यास चिखलीत पाेलिसांनीच लुटले! कारवाई टाळण्यासाठी घेतले १५०० रुपये; एअर रायफल पाहून तीन पाेलिसांनी मागितले दाेन लाख..!
यानंतर पुढे गेल्यावर पांढऱ्या रंगाच्या 'किया' कारने पाठलाग करत तीन अनोळखी पोलिसांनी त्यांची कार थांबवली. त्यांनी कारमधील एअर रायफल पाहून फिर्यादीकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीकडे एवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यावर त्यांना किमान पन्नास हजार रुपये द्यायला लावण्याचा प्रयत्न झाला. या घडामोडीमुळे घाबरलेल्या फिर्यादीने गाडी वेगात पुढे नेत देऊळगाव राजा दिशेने पलायन केले. दरम्यान, एका पोलिसाने गाडीतून खाली उतरल्यानंतर घाबरलेला फिर्यादी वाहनावरून नियंत्रण गमावून बसला व गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर पुन्हा ते तिघे पोलिस घटनास्थळी आले व पुन्हा पैशांच्या मागणीबाबत बोलत असतानाच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपी पोलिसांनी फिर्यादीला घटना उघड न करण्याची धमकी दिली.या प्रकरणी ताज अब्दुल रहमान रहमतुल्ला यांच्या फिर्यादीवरून पाेलिसांनी अभय (पोलीस), किरके (पोलीस), तीन अनोळखी पोलीसांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या लाचखाेर पाेलिसांविरुद्ध जिल्हा पेालीस अधीक्षक कुठलीही कारवाई करता याकडे लक्ष लागले आहे.