असं कुठं असतं का? बापानेच जाळले मुलाच्या लग्नातील आंदण साहित्य! डोणगावची घटना.. 

 
 डोणगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरात आग लावून बापाने मुलाच्या लग्नात आंदण आलेले साहित्य जाळले. ही घटना डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आरेगाव येथे  घडली. 

  याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  प्रकरणाचा तक्रार आरोपीच्या मुलाने दिली. त्यानुसार, ते आईसह बाहेर गावी गेले असताना कैलास साहेबराव बाजड यांनी राहत्या घराला आग लावुन घरातील आदण भांडे फ्रिज, टीव्ही, कपाट, मिक्सर व घर उपयोगी भांडे व महत्वाचे कागदपत्रे, कपडे जाळले दिसले. यावरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास गाडवे करीत आहेत.