शेगावच्या इरफानने मोठे कांड केले ! म्हणे, 'माझ्या बायकोला बाळ झाले तु दोन दिवस माझ्यासोबत बायकोसारखी रहा..

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) माझ्या बायकोला बाळ झाले आहे, तेव्हा तू दोन दिवस माझ्यासोबत बायकोप्रमाणे रहा! असे म्हणत शेगावच्या इरफानने विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी पिडीत विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख इरफान विरुध्द गुन्हा दाखल केला.
   प्राप्त माहितीनुसार, शेगाव शहरातील एका नगरात हा प्रकार घडला. तेथील रहिवासी २६ वर्षीय शेख इरफान याने पिडीत विवाहितेला रस्त्यात अडविले. माझ्या बायकोला बाळ झाले आहे, तू माझ्या सोबत दोन दिवस बायको प्रमाणे रहा असे तो पिडीतेला म्हणाला. एवढेच नाही तर त्याने तिचा वाईट उद्देशाने हातही धरला. त्यांनतर पुन्हा इरफान हा पिडीतेच्या घरासमोर आला, यावेळी प्रचंड घाबरलेल्या पिडीत विवाहितेने आरडाओरड केली. त्यांनतर इरफानने तेथून पळ काढला. असे तक्रारीत म्हटले आहे. २० जुलै रोजी पिडीत विवाहितेने पोलीसात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी शेख इरफान विरोधात गुन्हा दखल केला. पुढील तपास सुरू आहे.