घाटपुरीच्या आनंदनगर भागात रंगला होत डाव!;शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून पंधरा जणांना घेतले ताब्यात...

 
 खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव शहरा लागूनच असलेल्या घाटपुरी परिसरातील आनंदनगर भागात सुरू असलेल्या मोठ्या जुगाराच्या डावावर शिवाजी नगर पोलिसांनी धाड टाकून पंधरा जुगाऱ्यांना रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत आहे.

गुप्त माहितीच्या आधारे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकुन. घाटपुरीच्या आनंदनगर भागातून एकून पंधरा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.गुणवंत अर्जुन हिरडकर (३५) रा.आनंद नगर, गोपाल आत्मराम बिल्लारे (४०) रा.गोपाळ नगर, प्रशांत लालसिंग राठोड (२९) रा.घाटपुरी नाका अंबिका नगर, ,मंगेश रवींद्र राठोड (२५) रा.गोपाळ नगर,  गजानन शिवसिंग राठोड (३६) रा.घाटपुरी, शुभम  रामेश्वर मोरे (२६) रा.शिवाजी वेस, गोंधन अजय बोहरा (३०) रा.फरशी, राजेश संतोष पावर (२९) रा.शिवाजी फैल, स्वप्नील केशव टाले (३१) रा.गोपाळ नगर, फ्राफुल सानंदा (४४) रा.किसन नगर,सुनील किसन मटकर (५०) रा.भाटिया लेआउट गोपाळ नगर, सारंगधर अंभोरे (५०) रा.गोपाळ नगर, अभिषेक सदाशिव भोपे (३०) रा.पुंडलिक नगर, सागर प्रेमचंद जाधव (१९) रा.पवनपुत्र सिटी पंजाब लेआऊट यासह एक अज्ञात व्यक्ती हे पोलिसांना जुगार खेळताना दिसून आले पोलिसांनी याप्रकरणी या वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.