मनातलं कधी ओटावर येवू दिलं नाही; सावळा येथील संदीप जगताप यांनी खडकी शिवारात विषप्राशन करून स्वत:ला संपविले! सावळावासियांना धक्का.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) येथून जवळच असलेल्या सावळा गावातील रहिवासी संदीप बळीराम जगताप (४५ वर्ष) यांनी खडकी शिवारात निर्जन ठिकाणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल ४ जुनच्या सायंकाळी उघडकीस आली. 
संदीप जगताप यांचे बुलढाण्यातील मलकापूर रोड येथे धान्याचे दुकान आहे. जगताप हे कामानिमित्त सकाळीच गावातून बाहेर पडायचे तर रात्रीचं घरी पोहचायचे. असा त्यांच्या नित्य नियमित दिनक्रम बनला होता. कामाशिवाय दुसरा विचार कधी त्यांचा मनात आला नाही. सगळ्यांशी मनमिळाऊ माणूस म्हणून जगताप यांची ओळख होती. त्यांच्या मनातील विचारांमध्ये काय संघर्ष चालत होता हे कुणालाच समजले नाही! अचानकपणे त्यांनी उचललेले टोकाचे पाऊल समस्त सावळावासीयांसाठी धक्कादायक ठरले. मृतक संदीप जगताप यांच्या पार्थिवावर सामान्य रुग्णालयातील शवगृहात शवविच्छेदन करण्यात आले असून अंतिम संस्कारासाठी सावळा येथे नेण्यात आले आहे.