मासे पकडायला काल तलावात उतरला अजून परतला नाही! तलावाच्या काठावर आढळली चप्पल, छत्री! मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडीची घटना..
Jul 27, 2024, 16:20 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी गावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मासे पकडण्यासाठी तलावात उतरलेला व्यक्ती अद्यापही परतला नाही. तलावाच्या काठावर चपला, छत्री आणि कपडे आढळून आले आहेत.
सुनील दत्तात्रय इंगळे(४०, रा. विठ्ठलवाडी) असे तलावात गायब झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सुनील इंगळे हे काल,२६ जुलै रोजी मासे पकडायला जातोय म्हणून घरून सांगून गेले होते. मात्र रात्री उशिरा देखील ते आले नाहीत. घरच्यांनी व गावातील लोकांनी तलावाच्या काठावर पाहणी केली असता काठावर कपडे ,छत्री व चप्पल आढळली आहे. सध्या तलावात शोध सुरू आहे.