ब्युटी पार्लर चालणाऱ्या महिलेसोबत नको ते केलं! खामगाव शहरातील घटना; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या...

 

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेसोबत नको ते वर्तन करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी हा खामगाव तालुक्यातील घारोड येथील राहणारा आहे. गोपाल दुतोंडे असं आरोपींच नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित महिला ४० वर्षांची आहे. महिलेचे खामगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. या पार्लर मध्ये घुसून गोपाल दुतोंडे याने नको ते वर्तन केले.
   पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार आरोपीने महिलेच्या घराच्या खिडकीच्या काचा देखील फोडल्या. खिडकीत असलेले साहित्य फेकून दिले. शिवाय महिलेला वाईट उद्देशाने मागून पकडुन विनयभंग केला असा आरोप पिडीत महिलेने केला आहे. तक्रारीवरून पोलिसांनी गोपाल दुतोंडे विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.