माहेरहून पाच लाख आणण्यासाठी झोडपले, घरातून दिले हाकलून ;
सासरच्या छळाला विवाहिता वैतागली! बोराखेडी पोलीस ठाण्यात माहेरच्या पाच जणांविरोधात गुन्हा..
Jun 10, 2024, 09:02 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गिट्टी तयार करायची मशीन आणण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणायचे सांगत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. अखेर या छळाला कंटाळून पिडीत विवाहितेने शनिवार, ८ जून रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी माहेरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत विवाहितेचा विवाह अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे झाला होता. सासरच्या मंडळींनी पिडीतेला पैशासाठी घरातून हाकलून दिले. त्यानंतर पिडीता आपल्या माहेरी मोताळा येथे राहत आहे. गिट्टी तयार करण्याची मशीन घेण्याचा तगादा सासरच्या लोकांनी लावला आहे. त्यासाठी पिडीतेला माहेरहून पाच लाख रुपये आणायचे सांगितले. पैसे आणण्यासाठी तिला मारझोड करण्यात आली, शिवीगाळही केली. असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून, नदीम शहा मुसा शहा, मुसा शहा रहमान शहा, नगीनाबी मुसा शहा, शरीफ शहा मुसा शहा, रजीयाबी शरीफ शहा (सर्व रा. बोरगाव मंजु जिल्हा अकोला) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलीस स्टेशनचे हवालदार अशोक आडोकर करीत आहेत.