मद्यप्राशन करून कोयता हातात घेऊन फिरत होता; पोलिसांनी घडवली अद्दल! खामगाव शहरातील घटना..!

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मद्यप्राशन करून हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणे मद्यपीला चांगलेच महागात पडले. खामगाव शहर पोलिसांनी दणका देत गुन्हा दाखल केला आहे.
गौतम बाबुराव गवई (वय ५८, रा. बाळापूर फैल, खामगाव) असे आरोपीचे नाव आहे. १९ ऑगस्ट रोजी गौतम चौक परिसरात पान खाल्ल्यानंतर कोयता हातात घेऊन तो दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता.यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. खामगाव शहर पोलिस ठाण्यातील पोकॉ अनिल बुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीकडून कोयता जप्त केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाळे करीत आहेत.