सकाळ सकाळी भररस्त्यात करत होता चुकीचे काम! जानेफळ पोलिसांनी दाखविला 'खाकीचा' हिसका...
Updated: Jul 13, 2024, 14:57 IST
मेहकर(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे सकाळ सकाळी चुकीचे काम करत असताना एक व्यक्ती दिसून आला. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून खाकीचा हिसका दाखविला. आज सकाळी ९ वाजे दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.
काळ्या रंगाची प्लेटिना गाडी आणि त्यावर ठेवलेल्या दोन मोठ्या पिशव्या घेवून एक जण जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, 'तो' व्यक्ती गुटख्याची वाहतूक करत असल्याचे पोलिसांना समजले. कळंबेश्वर मंगळूर रोडवर पोलिसांनी धाड टाकली. त्या व्यक्तीची झडती घेतली असता केसरयुक्त तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला असे कायद्याने प्रतिबंधित असलेला माल दिसून आला. त्या व्यक्तीचे नाव विचारले तेव्हा, एजाज खान दिलदार खान(३४) असे त्याचे नाव असल्याचे समजले. तो मंगळूर नवघरे येथील रहिवासी आहे. गुटख्याच्या मालाविषयी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी एजाज खान याला ताब्यात घेतले. त्याच्या जवळील गुटखा, पान मसला , आणि तंबाखूजन्य पदार्थ व दुचाकी असा एकूण ६७ हजार ५५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जानेफळ पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्तिक कारवाई केली.