शेतीच्या वादावरून हाफ–मर्डर! जमिनीचा हिस्सा मागितला! मोठ्या भावाच्या जीवावर लहाना उठला! शेगाव तालुक्यातील घटना
Apr 23, 2025, 11:41 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतीचा हिस्सा मागत वाद घातल्याने लहान भावाने मोठ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.लहान भाऊ मोठ्याच्या जीवावर उठला, त्याला गंभीररित्या जखमी केले. ही घटना शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे घडली. जखमी झालेल्या मोठ्या भावास उपचाराकरता रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
पहुरजिरा येथील सहदेव पुंडलिक बेलोकार (७०) यांचा लहान मुलगा विजय सहदेव बेलोकार (३०) हा मागील काही दिवसांपासून शेतीचा हिस्सा मागत होता. या कारणावरून नेहमी वाद होत होता. दरम्यान २१ एप्रिलच्या सायंकाळी दरम्यान तो दारु पिवून घरी आला . त्याने पुन्हा त्याच कारणावरून वाद घालत मोठा भाऊ गिरीष सहदेव बेलोकार याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविला. यात गिरीष हा गंभीररित्या जखमी झाला असून कुटुंबियांनी त्याला त्वरित उपचारासाठी न रुग्णालयात भरती केले आहे. गिरीष बेलोकार याला मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याप्रकरणी सहदेव बेलोकार यांच्या तक्रारीवरुन जलंब पोलिसांनी विजय बेलोकार याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.