गुप्तांगावर लाथा मारून केला बापाचा खून! नंतर शेतातल्या जळतणात टाकून दिले पेटवून; पोलिसांत जाऊन म्हणे,बाप हरवला...बुलढाण्याच्या हतेडीत थरारक कांड उघडकीस..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथे थरारक कांड उघडकीस आले आहे. जन्मदात्या बापाचा खून करून नंतर मृतदेह शेतातल्या जळतणात टाकून पुरावा नष्ट करण्यात आला..त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांत जाऊन बाप हरवल्याची तक्रार दिली, पोलिसांनी मिसिंग दाखल केली... मात्र तपासादरम्यान या घटनेचा उलगडा झालाच..अखेर बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी खुनी मुलाला अटक केली आहे..
बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात ८ मे रोजी समाधान घायवट बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतांना पोलिसांना संशयास्पद बाबी आढळून आल्या.तपासात निष्पन्न झाल्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास दारू आणण्यावरून बाब लेकांमध्ये वाद झाला..या वादातून आरोपी मुलाने वडिलांच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारल्याने त्यांचा मृत्यू झाला..
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न..
या घटनेनंतर मुलगा प्रचंड हादरला..प्रकरण उघडकीस होऊ नये म्हणून मृतदेह शेतातल्या जळतणात टाकून पेटवून देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपी मुलाने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन वडील घर सोडून गेल्याची खोटी माहिती दिली..पोलिसांनी देखील बेपत्ता झाल्याची नोंद केली..
सुरुवातील हे प्रकरण केवळ बेपत्ता व्यक्तीच्या चौकशी पुरते मर्यादित होते.मात्र त्यानंतर कॉल डिटेल रेकॉर्ड, लोकेशन तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय मुलगा अनिकेत वर वळला..अनिकेत काहीसा गुमसुम राहत होता,फारसा कुणाशी बोलत नव्हता..त्याच्या स्वभावात झालेला बदल पोलिसांनी हेरला..पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने खुनाची कबुली दिली..