पिंपळगाव सराई येथील शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; पिंपळगाव सराई येथील घटना!
Aug 2, 2025, 08:59 IST
पिंपळगाव सराई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : येथील २६ वर्षीय शेतकरीपूत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल १ ऑगस्ट राेजी घडली. शंकर राजेंद्र गुंड (वय २६) असे मृतक तरूणाचे नाव आहे.
पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गुंड यांचा मुलगा शंकर गुंड हा सकाळी नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी शुक्रवारी सकाळी गोठ्यात गेला हाेता. दूध काढल्यानंतर त्याने भांडे गोठ्याच्या बाहेर ठेवले आणि नंतर दोराच्या साहाय्याने गोठ्याच्या आडोशाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल सुधीर जोशी आणि अझरुद्दीन काजी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येच कारण समजू शकले नाही. पुढील तपास रायपूर पाेलीस करीत आहेत.