अधिक मासानिमित्त देवदर्शनाला गेले कुटूंब! घरी चोरट्यांनी मारला डल्ला! ४५ ग्रॅम सोने, दीड लाख कॅश गायब... जलंब येथील घटना

 
 जलंब(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अधिक मासानिमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी नजर ठेवली. घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख दीड लाख असा ऐवज लंपास केला. भर दिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
शेगाव तालुक्यातील जलंब येथील सोनाबाई हरपालसिंग राजपूत या वारी हनुमान येथे देवदर्शनासाठी कुटुंबासह गेल्या होत्या. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरावर हात साफ केला. कुलूप उघडून घरात प्रवेश करीत बेडरूम मध्ये असलेल्या लाकडी कपाटातील सोन्याची ४० ग्रामची गहू पोत, ५ ग्रॅम कानातील सोन्याचे दागिने आणि दीड लाख रुपये कॅश असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.