BREKING धाडमध्ये पकडल्या ८८३००० रुपयांच्या नकली नोटा! बुलडाणा LCB ची दमदार कारवाई....

 
 धाड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धाडमध्ये बुलडाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ८ लाख ८३ हजार रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे...
धाड ते छत्रपती संभाजी नगर रोडवर म्हसला खुर्द शिवारात गीतांजली फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटचे समोर ही कारवाई करण्यात आली. काही लोक नकली नोटा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नाकाबंदी केली होती. दरम्यान छत्रपती संभाजीनगर करून येणारी सिल्व्हर रंगाची ईरटीगा गाडी (क्रमांक एम एच १२, व्ही व्ही ०१३०) पोलिसांनी थांबवली. शासकीय पंच व कोषाधिकार अधिकारी यांच्या समक्ष गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ५०० रुपयांच्या १६७० व २०० रुपयांच्या २४० बनावट नोटा जप्त केल्या. बनावट नोटांची एकूण किंमत ८ लाख ८३ हजार एवढी आहे. नोटा बनावत असल्याचे शिक्कामोर्तब कोषाधिकार अधिकाऱ्यांनी केली आहे. एकूण दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोघेही पुण्यातील आहेत. मंगेश दादासाहेब वाळे (५१) आणि मोहन वालिया मुडावत (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या आदेशाने सपोनि आशिष चेचरे, सपोनि यशोदा कनसे, पोहेकॉ राजेश टेकाळे, अनुप मेहर, पोना विजय वारूळे, विजय पैठणी, मंगेश संनगाळे, दीपक वायाळ, ऋषिकेश थूट्टे, समाधान टेकाळे, सायबर पोलीस स्टेशनचे राजू आढवे, ऋषिकेश खंडेराव यांनी केली...