EXCLUSIVE ३ लाख ७५ हजार घेऊन तरुणाचे लग्न लावले! सत्यनारायण पूजा झाल्यावर झाला वेगळाच "गेम"...! तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली! मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आपबिती सांगताना तरुण ढसाढसा रडला...

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली नवऱ्या मुलांची संख्या वाढायला लागली आहे.. मुलाचे लग्न लावून देण्यासाठी मुलाच्या कुटुंबियांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.. मात्र मुलींची संख्या कमी असल्याने अनेक मुले तिशी ओलांडून देखील अविवाहित आहेत..प्रसंगी मुलीकडच्या मंडळींना पैसे देऊन मुलाचे लग्न लावण्यात येते.. मलकापूर तालुक्यातील असाच एक प्रकार घडला, ३ लाख ७५ हजार रुपये मुलीकडच्या मंडळींना देऊन तरुणाचे लग्न झाले... सुखी संसाराची स्वप्ने तो पाहू लागला, 
मात्र लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर जो प्रकार घडला तो पाहून तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.. रडत रडत बिचाऱ्या नवरदेवाने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले, नवऱ्या मुलाच्या हाताला मेहंदी लागलेली होती..हतबल झालेल्या त्या तरुणाने आपली आपबीती पोलिसांना सांगितली..ती ऐकून पोलिसही चक्रावले...पोलिसांनी नवरी कडच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला. दोघांना अटक केली असून नवरी, नवरीची आई आणि नवरीचा मामा फरार आहे..
 
मलकापूर तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणाचे लग्न झालें. त्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांना ३ लाख ७५ हजार रुपये दिले. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली.त्यानंतर अकोल्यात नवरीच्या घरी देखील सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी नवरदेव गेला. तिथे पूजा झाल्यानंतर मात्र धक्कादायक प्रकार घडला, ज्याचा तरुणाचे स्वप्नात देखील विचार केला नव्हता...
नेमकं काय झालं?
लग्नाच्या तिसऱ्या दिवशी अकोल्यात नवरीच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली. पूजा आटोपून नवरदेव नवरीला घेऊन आपल्या घरी जाणार होता, सुखी संसाराची स्वप्ने त्यांनी रंगवली होती..मात्र अकोल्यात नवरीच्या घरी भलतच घडलं.. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर ज्या मध्यस्थी दलालांनी ३ लाख ७५ हजार घेऊन तरुणाचे लग्न लावून दिले होते, त्यांनी तरुणाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. नवरदेव तरुणाला नवरीकडच्या मंडळींनी हाकलून दिले..." मी तुम्हाला पैसे दिले आहेत, माझे लग्न तुम्ही लावून दिले आहे, माझ्या पत्नीला माझ्यासोबत पाठवा नाहीतर माझे पैसे परत करा" असा तगादा तरुणाने लावला. त्यावेळी त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली.. पैसेही गेले आणि बायकोही गेली याची खात्री झाल्यावर हतबल तरुणाने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाणे गाठले.. मलकापूर पोलिसांना घडला प्रकार सांगितला.. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची वेगाने सूत्रे हलवली...
धक्कादायक सत्य समोर...
दरम्यान या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना धक्कादायक सत्य समोर आले. पोलिसांनी यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यातील दोन दलालांना अटक केली आहे. नवरी, नवरीची आई आणि नवरीच्या मामाचा पोलीस शोध घेत आहेत. होनाजी संभाजी खापरकर (३७, पुसद) आणि लाला हरिश्चंद्र महाजन (३६, मालेगाव,वाशीम) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ५० हजार रोख व एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.. दरम्यान पोलीस तपासात ही तरुणांना फसवणारी टोळी असल्याचे समोर आले आहे.. लग्नाची वय झालेल्या अर्थात वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना संपर्क साधायचा, त्यांना लग्नाची आमिष दाखवायचे, आमच्याकडे स्थळ आहे असे सांगून मुलगी दाखवायची, किंबहुना लग्नही लावायचे आणि त्याच्या माध्यमातून पैसे उकळायचे असा धंदा करायची ही टोळी असल्याचे उघड झाले आहे...