चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आई वडिलांनी मोठ्या कष्टाने तिचे लग्न लावून दिले. सुखी संसाराची स्वप्ने रंगवून ती सासरी आली..मात्र तिच्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवलंय हे तिला माहीत नव्हत...सासरी आल्यानंतर तिच्या साऱ्या स्वप्नांवर पाणी फिरले..नवरा तिला जवळ घेत नव्हता, लग्नानंतर बरेच महिने उलटून गेले तरी नवरा तिला शारीरिक सुख देत नव्हता.. नवऱ्याने तिला शारीरिक सुखापासून वंचित ठेवले..ही बाब तिने सासू सासऱ्यांच्या कानावर टाकली..मात्र सासू सासऱ्यांनी तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता तिलाच मारहाण केली..तिच्या लहान दिराला ही बाब माहीत होती..नियत फिरलेल्या लहान दिराने वहिनीवरच बलात्कार केला..माझा भाऊ माणसात नाही, त्याची कमी मी पूर्ण करतो असे तो वहिनीला म्हणायचा..या बळजबरीच्या संबंधातून ती दिरापासून प्रेग्नेंट राहिली..समाजात बदनामी होऊ नये म्हणून सासरच्या मंडळींनी लहान दिरासोबत तिचे लग्न लावून दिले..काही दिवस तिचा उपभोग घेतल्यानंतर तिचा लहान दिरही बाळाला आणि तिला वाऱ्यावर सोडून पुण्यातून पसार झाला..आता पिडीतेने अमडापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
खामगाव तालुक्यातील रहिवासी असलेल्या पीडितेचा विवाह २०२० मध्ये मंगरूळ नवघरे (ता.चिखली) येथील एकाशी झाला होता. पीडितेला पती, तीन दिर, सासु आणि सासरे असून एक दिर संभाजीनगर, दुसरा गावातच विभक्त तर तीसरा दिर, पीडिता, पीडितेचा पती व सासु-सासरे हे एकत्रित वास्तव्यास आहेत. लग्नानंतर पीडिता रिवाजाप्रमाणे सासरी नांदायला गेली. मात्र, पहिल्याच दिवसापासून पीडितेच्या पतीने तीच्यासोबत शारीरीक अंतर ठेवले. काही दिवस त्याचा विरह सहन केल्यानंतर पीडितेने ही बाब आपल्या सासूच्या कानावर घातली.👇
मात्र, सासुने आपल्या मुलात असलेली कमी लपविण्यासाठी तीच्या बोलण्याला बगल दिली. तीन-चार महिने उलटूनही पती प्रेम द्यायला तयार नसल्याने पीडिताने पुन्हा सासूच्या कानावर घातले असता, पती, सासु, सासरा व दिराने पीडितेस मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून तीला घराबाहेर काडून दिले. त्यामुळे पीडिता तीच्या माहेरी आई-वडिलांकडे निघुन गेली.👇
पंधरा दिवसानंतर लहान दिर मोटारसायकलने पीडितेला घ्यायला तीच्या माहेरी गेला. सासरच्या मंडळींना झालेल्या चुकीचा पश्चाताप झाल असेल, आता तरी माझ्या सोबत चांगले वागतील, पतीला समजावून सांगतील, या आशेने पीडिताही मोठ्या खुशीत दिरासोबत माहेरी जाण्यास निघाली. तेव्हा 'माझा भाऊ माणसात नाही, म्हणून तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही, तुम्ही मला खूप आवडता, माझ्या भावाची कमी मी पूर्ण करतो', असे दिर पीडितेस म्हणाला. त्याचे बोलने ऐकुन पीडिताने 'तुम्ही माझे दिर आहात, तुम्हाला असे बोलणे शोभत नाही', असे म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि घरी पोहोचल्यानंतर घडलेला प्रकार सासू आणि पतीला सांगितला. मात्र, त्यांनी पीडितेस शिवीगाळ केली. तसेच ही गोष्ट माहेरच्या लोकांना सांगितल्यास जिवाने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीचा विरह, सासु-सासऱ्यांकडून होणारा शारीरीक व मानसिक छळ निमुटपणे सहन केला.👇
दरम्यान, ऑगस्ट २०२० पीडिता घरात एकटीच असल्याची संधी साधून तीच्या लहान दिर योगेशने तीच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. ही बाब सासू व पतीच्या कानावर घालुनही त्यांनी पीडितेला मारहाण करत आरोपी दिराची पाठराखन केली. त्यांनतरही त्याने वारंवार पीडितेच्या शरीराचे लचके तोडले. नव्हेतर यातून पीडिता गर्भवती राहून ११ सप्टेंबर २०२१ रोजी तीला मुलगी झाली. 'तुझी मुलगी आम्ही स्वीकारतो, पण तुझा पती माणसात नाही, हे कोणाला सांगू नको. मुलगी लहान दिराची असल्याने आता त्याच्या बरोबर लग्न करायचे', असी धमकी देत तीचा वारंवार छळ केला. त्यामुळे पीडिता माहेरी निघुन गेली आणि घडलेला प्रकार आई-वडिलांच्या कानावर घातला. त्यांनी सासरच्या मंडळीची बैठक बसवून १० जानेवारी २०२४ रोजी खामगाव येथील रेणुका देवी मंदिरात लहान दिरासोबत पीडितेचे लग्न लावून
दिले. 👇
लग्नानंतर आरोपी लहान दिर पीडितेला घेऊन पुणे येथे गेला. काही दिवस सोबत राहील्यानंतर १७ मे २०२४ रोजी कामाला जात असल्याचे सांगुन पीडिता व तीच्या बाळाला वाऱ्यावर साडून पुणे येथून फरार झाला.👇
या प्रकरणी पीडितेने अमडापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी नवरा, लहान दिर आणि सासू व सासऱ्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६ (२) (न), ४९८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस अंमलदार चोपडे हे करीत आहेत.