एक्सचेंज ऑफर! म्हणे, तुझ्या नवऱ्याचे माझ्या बायकोसोबत अफेयर,आता तू माझ्यासोबत कर....पुढे काय घडलं? अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना...
Updated: Oct 1, 2024, 19:48 IST
अंढेरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अजबच प्रकार समोर आला आहे. एका विवाहित पुरुषाने विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. पिडीत विवाहितेच्या नवऱ्याचे आरोपीच्या बायकोसोबत अफेयर होते, त्याचा राग मनात धरून आरोपीने पिडीत विवाहितेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातील आहे. सदर गाव अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. तक्रारदार विवाहिता ३० वर्षांची आहे. घटना काल,३० ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेसहाची आहे.👇
घटनेच्या वेळी विवाहितेचा पती घरी नव्हता.त्यावेळी आरोपी तक्रारदार विवाहितेच्या घरात घुसला."तुझ्या पतीचे माझ्या बायकोसोबत अफेयर आहे, आता तू पण माझ्या सोबत चल" असे म्हणत आरोपीने विवाहितेचा हात धरला. विवाहितेने आरडा ओरड करून कशीबशी सुटका करून घेतली. आज याप्रकरणी विवाहितेने अंढेरा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली, तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहेत...