सगळेच सुन्न..! काँग्रेस नेते सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू...
Nov 13, 2025, 08:41 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बातमी लिहितांना हात थरथरत आहेत, घटनाच एवढी धक्कादायक आणि दुःखद आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वपक्षीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे नेते डॉ.सत्येंद्र भुसारी यांचे रेल्वेतून पडून अपघाती निधन झाले. काल,१२ नोव्हेंबरच्या दुपारी अडीच ते ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
डॉ.सत्येंद्र भुसारी हे काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचे निरीक्षक म्हणून त्यांनी संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हापरिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार होते. भला माणूस ,आपला माणूस म्हणून त्यांचे सर्वपक्षीय मित्रत्वाचे संबंध होते. मुळचे भोरसा भोरसी येथील असणारे डॉ.सत्येंद्र भुसारी सध्या चिखली शहरातील गांधीनगरात राहत होते. काल मुंबईवरून परत येत असताना कसारा घटात रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला. डॉ.भुसारी यांच्या निधनाने चिखलीच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे..