आईसह दोन वर्षीय चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांत मिसिंग दाखल... कुटुंबीय परेशान; मायलेकाची जोडी तुम्हाला दिसली तर पोलिसांना नक्की कळवा...
Updated: May 8, 2026, 16:15 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडोळ गावातील विवाहित महिला व तिचा दोन वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांडोळ येथील रहिवासी सचिन सुनिल देशमुख (वय ३६) यांनी २३ एप्रिल रोजी धाड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सचिन देशमुख (वय २४) या १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजल्यानंतर पांग्री येथील नातेवाईकांकडे ठेवलेले सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा दोन वर्षीय मुलगा श्री सचिन देशमुख हाही होता.
मात्र, संध्याकाळपर्यंत दोघेही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात शोधाशोध सुरू केली. विविध ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी धाड पोलीस स्टेशन गाठत मिसिंगची तक्रार नोंदविली.
बेपत्ता महिलेचे वर्णन उंची अंदाजे ५.५ फूट, रंग गोरा, केस काळे व वाढलेले असे आहे.
या महिला व बालकाबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार शांताराम जाधव करीत आहेत.