खामगावात वीजचोरी प्रकरण उघड; जिजाऊ नगरातील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल...
Updated: Mar 30, 2026, 08:56 IST
खामगांव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वीजचोरी प्रकरणी २७ मार्च रोजी खामगाव शहर पोलिसांनी येथील जिजाऊ नगर भागातील पती-पत्नी विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत उत्तमराव कलोरे अतिरिक्त कार्यक्रारी अभियंता भरारी पथक म. रा. वि. वि. मर्या. बुलडाणा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील जिजाऊ नगर भागातील प्रकाश भगवानराव टिकार व त्यांच्या पत्नी सौ. टिकार यांचे घरी २६ फेब्रुवारी रोजी पथकातील सहकाऱ्यांसह पाहणी केली असता १९ महिन्यांपासून विद्युत वितरण कंपनीच्या ६२५७युनिट १ लाख ८० हजार ७७४ रूपयांची वीज चोरी केल्याचे आढळून आले. विद्युत कायदा २००३ सुधारित कायदा २००७ चे कलम १३५ नुसार विजेची चोरी करणे हा दखलपात्र गुन्हा असून तडजोड रक्कम १४ हजार रूपये एवढी आहे. सदर वीज वापरकर्ते प्रकाश टिकार व त्यांच्या पत्नी यांना वेळ देवूनही अद्यापपर्यंत तडजोड रकमेचा भरणा केला नाही. त्यामुळे उपरोक्त पती-पत्नी विरूध्द कलम १३५ भाविकाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.