भरधाव आयशरने दुचाकीस्वारास चिरडले; युवक जागीच ठार; रायपूर येथील पेट्रोल पंपाजवळील घटना; आयशर चालकास अटक...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अंगणवाड्यांना पाेषण आहाराचे वाटप करण्यासाठी जात असलेल्या भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना रायपूर येथील पेट्रोल पंपाजवळील वळणावर १९ ऑक्टाेबर राेजी घडली. मुबारक शहा सलीम शहा असे मृतकाचे नावे आहे. 
अंगणवाडींना शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणारे आयशर वाहन क्र. एम. एच. ४१ जी. ७३४९ हातणीकडून रायपूरकडे भरधाव वेगाने येते होते. सदर आयशरने आज १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७वाजेच्या सुमारास येथील पेट्रोल पंपाजवळ रायपूर बसस्थानक येथून पांगरी फाट्याकडे येणाऱ्या दुचाकी स्वार मुबारक शहा सलीम
शहा (वय २८) रा. रायपूर याच्या दुचाकीला समोरुन जबर धडक दिली.
वाहनाने जवळपास ६० फुटापर्यंत दुचाकीस्वारास फरफटत नेले. यामध्ये दुचाकीस्वार मुबारक शहा हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खाजगी वाहनाने बुलढाणा येथील रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
याप्रकरणी रायपूर पोलिसांनी आयशर चालक अर्शद खान आरिफ खान धाड यास अटक केली असून त्याच्याविरुध्द रायपूर पोस्टे. ला विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेकाँ. दशरथ शितोळे व आशिष काकडे तपास करीत आहे.