हुंडा कमी दिला म्हणून कुणी असं करता का? वाचा शेगावात काय घडलं....
Updated: Nov 29, 2024, 12:49 IST
शेगांव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) हुंडा कमी दिल्याने तसेच माहेर कडून दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात शेगाव शहर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.....
शेगाव येथील ज्योती गोपाल संबारे वय (२८) वर्ष या विवाहितेचा विवाह मलकापूर तालुक्यातील बेलाड येथील गोपाल संभारे यांच्याशी झाला. विवाहानंतर विवाहिता सासरी नांदावयास गेली. दरम्यान, सासरच्यांनी सुरुवातीचे काही दिवस तिला चांगली वागणूक दिली. त्यानंतर माहेरवरून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला, आणि हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला अश्या विवाहितेच्या तक्रारीवरून शेगांव पोलिसांनी पती गोपाल गुलाबराव संबारे (३२),सरस्वतीबाई गुलाबराव संबारे (६५), ज्ञानेश्वर गुलाबराव संबारे (३५), तिघेही रा.बेलाड आणि लता शिवाजी अढाव (४०),शिवाजी अढाव पाटील (४५), दोघेही रा.कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव यांच्या विरोधात भादंवि कलम ४९८ (अ), ३२३,५०४, ५०६, ३४ सहकलम ३, ४ हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.