समृध्दी महामार्गावर मृत्यूचे तांडव! उभ्या ट्रकला ट्रॅव्हल धडकली; सैलानीवरून दर्शन घेऊन जाणाऱ्या १२ भाविकांचा जागीच मृत्यू; १८ गंभीर जखमी...

 
छत्रपती संभाजीनगर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): उभ्या ट्रकला मिनी ट्रॅव्हलने धडक दिल्याने ट्रॅव्हलमधील १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. समृध्दी महामार्गावर वैजापूर येथे मध्यरात्री १२ ते १ च्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील जखमी व मृत नाशिक जिल्ह्यातील निफाडचे आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानीबाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन घराकडे जात असताना त्यांच्यावर काळ ओढवला..
 प्राप्त माहितीनुसार या अपघातात आरटीओ अधिकाऱ्यांचा दोष असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीओ अधिकाऱ्यांची चुकीच्या ठिकाणी ट्रक अडवला, त्यामुळे मागुन येणाऱ्या मिनी ट्रॅव्हलच्या चालकाला काही कळायच्या आत ती उभ्या ट्रकवर धडकली. यात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण काही जखमींची प्रकृती अगदीच चिंताजनक आहे. जखमींवर छत्रपती संभाजीनगरतील घाटी व वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.