भिंत ओलांडून घरात शिरला अन्... महिलेसमोर ठेवली धक्कादायक मागणी; विरोध करताच पुढे काय घडलं? जळगाव जामोद तालुक्यातील घटना...
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, शनिवार, २१ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित व्यक्तीने थेट घराच्या अंगणात प्रवेश केला. तो नेमका कशासाठी आला आहे, याचा अंदाज येण्याआधीच त्याने महिलेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढील काही क्षणांत त्याचे वर्तन संशयास्पद बनत गेले.
महिलेच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने तिच्याजवळ जात तिचा हात पकडला. त्यानंतर त्याने अशी मागणी केली की, महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती घाबरली, मात्र तिने धैर्य दाखवत त्यास विरोध केला.मात्र विरोध होताच परिस्थिती आणखी चिघळली. आरोपी संतापल्याचे सांगितले जात आहे. वाद वाढत गेला आणि महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला. प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी महिला झुंज देत असताना आरोपीने आक्रमक भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, त्याने महिलेस चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरूपाच्या धमक्याही दिल्या. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने अखेर पोलिसांकडे धाव घेत संपूर्ण प्रकार कथन केला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीचे नाव नागो लहेनसिंग राठोड (वय ४०, रा. कुरणगाळ खुर्द) असे आहे. महिलेच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५, ११५(२) व ३५१(२)अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे करीत असून, भरदिवसा घराच्या सुरक्षिततेलाच आव्हान देणाऱ्या या प्रकरणामुळे परिसरात एकच चर्चा रंगली आहे. आता तपासात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.