शेत रस्त्याचा वादातून चुलत भावाच्या गाेठ्याला लावली आग; जळगाव येथील घटना!

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतरस्त्याच्या वादातून चुलत नावानेच गाेठ्याला आग लावल्याने शेतकऱ्याचे दाेन लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील जळगाव येथ एक गाय, २५ पोती धान्य, ३७ पोती खत, शेती औजारे व साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी सिंदखेड राजा पेालिसंनी आराेपी चुलत भाउ दत्तात्रय वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव येथील विष्णू हरीभाऊ वाघ आणि दत्तात्रय नारायण वाघ हे दोघेही चुलभ भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये शेत रस्त्यावरील मालकी आणि वापराबाबत वाद सुरू आहे.या वादातून दत्तात्रय वाघ यांनी सायंकाळी विष्णूच्या गोठ्याला आग लावली. त्यावेळी गोठ्यात गायदेखील बांधलेली होती. या आगीत गाय व इतर साहित्य जळून खाक झाले. विष्णू वाघ यांच्या तक्रारीवरून दत्तात्रय वाघ यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.