मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली अपघाताच्या घटनास्थळी भेट! देऊळगावराजात जखमींची विचारपूस केली! मुख्यमंत्री म्हणाले, दुःख मोठे....
ठाण्यावरुन मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरला विमानाने आले. तिथून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस समृध्दी महामार्गाने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर दोघेही देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात पोहचले. तिथे अपघातातून वाचलेल्या जखमींची, नातेवाईकांची विचारपूस केली. "आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. उपचाराची काळजी करू नका" असे मुख्यमंत्री जखमींशी बोलतांना म्हणाले. "या अपघाताचे दुःख मोठे आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे" असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यानंतर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाला.