प्रेमात दगाफटका? प्रेयसीसह तिच्या आईच्या मानसिक त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल! बुलडाणा तालुक्यातील धक्कादायक घटना...
तक्रारकर्ते, मृतकाचे वडील सुदाम केदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा सागर याचे त्याच्याच गावी राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्या संदर्भामध्ये मृतक व त्याच्या प्रेयसीमध्ये वारंवार फोनवरून बोलणे व्हायचे. परंतु, प्रेयसीची आई या संबंधांना विरोध करत होती.
या दरम्यान मृतकाच्या प्रेयसी व तिच्या आईकडून सागर यास वारंवार मानसिक त्रास देण्यात येत होता. तसेच प्रेयसीकडून धमक्याही दिल्या जात होत्या. यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्या केल्याचे तक्रारदार वडिलांनी पोलिसांत नमूद केले आहे.
प्रेयसीने दिली होती फाशी घेण्याची धमकी...
२१ जुलै रोजी सागरला त्याची प्रियशी फोनवरून धमक्यादेत होती. प्रेयसीने त्यास म्हटले की ‘माझी आई तुला ठार करेल, मी तुला फाशी देईन, मला आयुष्यात त्रास दिलास तर मी माझ्या आईला घेऊन तुझ्या घरी येईन व तुझा जीव घेईन,’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या होत्या.
माझा मुलगा सागर याला मानसिक त्रास दिला. त्याच्या मनात भीती निर्माण करून मानसिक खच्चीकरण केले. त्यामुळेच सागरने आत्महत्या केल्याचे सागरच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
उपचार सुरू असतानाच...
या मानसिक त्रासाला कंटाळून सागरने विषप्राशन केले. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडील सुदाम केदारे यांच्या फिर्यादीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात मृतकाच्या प्रेयसी व तिच्या आईविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.