चारित्र्यावर संशय, घरगुती कलह; विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय; विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..!
Aug 23, 2025, 10:32 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरगुती व शुल्लक कारणांवरुन तसेच चारित्र्यांवर संशय घेवून सासरकडील मंडळीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना २१ ऑगस्ट रोजी मोताळा शिवारात उघडकीस आली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पतीसह ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात फिर्यादी प्रदीप गंगाराम झिटे रा. वडोदा ता. मुक्ताईनगर जि. जळगाव (खान्देश) यांनी बोराखेडी पोस्टेला आज २२
ऑगस्ट रोजी दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, त्यांची नातेवाईक मयत सौ. मिना दादाराव शिंदे (वय २५) रा. पिंपळगांव नाथ ता. मोताळा हीचा तिचे पती दादाराव हरी शिंदे, विजय हरी शिंदे, साखराबाई हरी शिंदे व चिमा गजानन शिंदे हे घरगुती शुल्लक कारणांवरुन तसेच तिच्या चारीत्र्यांवर संशय घेवून छळ करीत होते.आरोपी हे शिवीगाळ व मारहाणही करीत असत. वारंवार मिना शिंदे हीच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले होते.
त्यांच्या
जाचाला कंटाळून तीने मोताळा शिवारातील अभय देशमुख यांचे शेतामधील विहीरीमध्ये उडी घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी सासरच्या चौघांविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०८, ८५, ११५, ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.यामधील आरोपी दादाराव हरी शिंदे यास अटक करण्यात आली आहे.