आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार! मरीन ड्राइव्ह पोलिसांची कारवाई...बुक्की मारल्याचे प्रकरण 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आ.संजय गायकवाड यांच्या विरोधात मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला आ.गायकवाड यांनी मारहाण केली होती. त्यानंतर विरोधकांकडून हे प्रकरण चांगलेच उचलले होते..
आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता. त्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. सभागृहात बोलताना देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ.गायकवाड यांची कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे..