समृद्धी महामार्गावर अज्ञात ट्रकवर कार आदळली; चालक जागीच ठार, एक गंभीर जखमी...
Nov 5, 2025, 11:05 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर अज्ञात ट्रकवर कार आदल्याने चालक जागीच ठार तर एक जण जखमी झाला.ही घटना
डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या समृद्धी महामार्गावर चॅनल क्र. चाईनेज क्रमांक 262.00 मुंबई कॉरिडरवर ३नोव्हेंबर ला रात्री १० वाजता घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार क्रमांक MH 29AR 5792 चा चालक हा नागपूरहूनमुंबईकडे जात असताना सदर कार ने समोरील अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये कारचालक भाविन जसवंत नंदा वय ४० वर्ष राहणार यवतमाळ हा जागीच ठार झाला तसेच सोनी पांडे वय 30 ही गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी ला संभाजी नगर येथे हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोस्टे डोणगाव चे पवन गाभणे व पोलीस अंमलदार चव्हाण हजर होते. मृतक व जखमी यास ॲम्बुलन्स मध्ये दवाखान्यात रवाना करण्यात आले.अपघात ग्रस्त वाहन रोडचे बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.