लोणीगवळी येथे घरफोडी; एक लाख २८ हजारांचा ऐवज लंपास...
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रघुनाथ तुकाराम दोडके (रा. लोणीगवळी) हे पत्नीसमवेत मुलीला भेटण्यासाठी कारंजा लाड येथे गेले होते. तेथून परत घरी आल्यानंतर घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तुटलेला दिसून आला.घरात प्रवेश करून पाहणी केली असता, लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले आढळले. लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याची पट्टी-पाते – ३० ग्रॅम, सोन्याचे कानातील झुमके – ३ ग्रॅम, दोन सोन्याच्या अंगठ्या – एकूण ८ ग्रॅम व चांदीची हातातील पट्टी – १० ग्रॅम असा एकूण किंमत अंदाजे १ लाख २८ हजार एवज चोरट्यांनी लंपास केला आहे. फिर्यादी रघुनाथ दोडके यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (३) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.