BREAKING पोलिसांच्या मालमत्तेवर चोरट्यांचा डल्ला; पावणेतीन लाखांचा मुद्देमाल दामटला! बुलढाणा शहरातील धक्कादायक घटना.. 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) येथील पोलीस कवायत मैदानापासून काही अंतरावरच असलेल्या पोलिसांच्या नवीन वसाहत इमारतीमधील लाखो रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना काल १४ जून रोजी उघडकीस आली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कवायत मैदानानजीक पोलिसांची नवीन वसाहत इमारत आहे. या इमारतीचे पूर्ण बांधकाम झाले असून इंटेरिअरिंगचे कामे सुरू आहे. इमारतीत एकूण ११२ फ्लॅटची बांधणी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्लबिंगचे काम सुरू आहे. यासाठी प्लंबिंग साहित्यासह, महागडे नळ, शावर त्याठिकाणी ठेवण्यात आले होते. दरम्यान, दरवाजा उघडा असल्याने ८ जून ते १३ जूनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सर्व महागडे साहित्य लंपास केले. खाजगी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर गोपाल पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोहचून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी पाहणी केली.