BREKING लाज सोडली! शिक्षकी पेशाला काळीमा! जिल्हा परिषद शिक्षकाने केला स्वतःच्या १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार; बोलेरो कार मध्ये घेतला उपभोग!
बालाजी मंदिराच्या गेटजवळ केले पाप; मुलीने प्रतिकार केला पण काच बंद होते! बुलडाणा शहर पोलिसांनी काही तासांत वासनांध मास्तरला ठोकल्या बेड्या..
Nov 7, 2023, 12:22 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना बुलडाणा शहरातून समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला, विशेष म्हणजे पीडित मुलगी आरोपी मास्तरची गेल्या वर्षीपर्यंत विद्यार्थिनी होती. सध्या पीडित मुलगी बुलडाणा शहरातील एका वस्तीगृहात शिक्षण घेत आहे. काल,६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पीडित मुलीने बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी वासनांध मास्तर विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. आरोपीची बोलेरो कार सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
आरोपी सतीश विक्रम मोरे(४१) हा मोताळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या एका शाळेत शिक्षक आहे. पिडीत विद्यार्थिनी गेल्या वर्षीपर्यंत तो ज्या शाळेत शिक्षक आहे त्याच शाळेची विद्यार्थिनी होती. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने सध्या पीडित विद्यार्थिनी बुलडाणा शहरातील एका वस्तीगृहात राहून शहरातील एका शाळेत शिक्षण घेते.
बालाजी मंदिराच्या गेटजवळ अत्याचार..
आरोपी सतीश मोरे हा बुलडाणा शहरातील राहणारा आहे. पिडीत मुलगी बुलडाणा शहरातील वसतिगृहात शिक्षण घेत असल्याचे त्याला माहित होते. १६ सप्टेंबर ला पीडित मुलगी तिच्या शाळेत जात होती. त्यावेळी सकाळी ११ च्या सुमारास सतीश मोरे हा बोलेरो कार घेऊन त्याच रस्त्याने आला. मुलीला थांबवून तिची विचारपूस केली व तुला शाळेत सोडतो म्हणत गाडीत बसवलं. मात्र गाडी शाळेजवळ जाऊनही मास्तरने गाडी थांबवली नाही. " तुझे शाळेतल्या कार्यक्रमादरम्यान कपडे बदलतांनाचे फोटो माझ्याजवळ आहेत, ते तुला दाखवायचे आहेत" असे म्हणत सतीश मोरे याने गाडी थेट मलकापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या गेटजवळ नेली. तिथे गाडी उभी केल्यावर सतीश मोरे मागच्या सीटवर येऊन बसला. तुझे फोटो व्हायरल करील, तुझ्या शाळेतील मुलांना दाखवील,तुझी बदनामी करील अशी धमकी त्याने पीडित मुलीला दिली. तसे करायचे नसेल तर मी सांगतो ते कर, असे म्हणत मुलीवर कारमध्येच जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरड करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचे काच बंद होते व ते काळ्या रंगाचे होते असे पीडित मुलीने तक्रारीत म्हटले आहे.या प्रकारानंतर मास्तरने पीडित मुलीला तिच्या वस्तीगृहाजवळ आणून सोडले, घडला प्रकार कुणाला सांगितला तर कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. या दिवशी मुलीची तब्येत बिघडल्याने शाळेत न जाताच वस्तीगृहावर थांबली..
दुसऱ्यांदा क्लास जवळ गाठले...
दरम्यान पुन्हा ५ दिवसांनी सुरेश मोरे याने पीडित मुलीला तिच्या शिकवणी वर्गाजवळ गाठले. पुन्हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देत गाडीत बसवून एका सुनसान जागेवर नेऊन अत्याचार केला, असा प्रकार आतापर्यंत तीनदा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. अखेर आयुष्यभर हे असेच सोसावे लागेल याची भीती वाटल्याने पीडित मुलीने काल तिच्या आईसह येऊन बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. आरोपीची बोलेरो कार सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत..