BREKING बापा बापा बापा! बुलडाणा एलसीबीने धाड जवळ पकडला १ कोटीचा गांजा; मोताळा तालुक्यातील कुऱ्हा गावच्या राहुल साबळेला अटक! आता पोलीस शोधतायेत "या" प्रश्नांची उत्तरे...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात सध्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच बुलडाणा एलसीबी पथकाने धाडजवळ मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल ४ क्विंटल ५९ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्या. गांजाची वाहतूक करणारा ट्रक आणि चालकाला देखील स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे . आज ९ नोव्हेंबरच्या पहाटे ३ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल गोटीराम साबळे (२७, रा. कुऱ्हा,ता. मोताळा) याच्याविरुद्ध धाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

                          जाहिरात 👆

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातल्या अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्याचे आदेश एसपी सुनील कडासने यांनी जिल्हा पोलिस दलाला दिले होते. छत्रपती संभाजीनगरवरून भोकरदन मार्गे धाड शहराकडे एक ट्रक येत असून त्यात अंमली पदार्थ असल्याची माहिती खबऱ्यांकडून स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे "टीम एलसीबी"ने धाड पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल स्वराज जवळील राज्य महामार्गावर सापळा रचला.
 छत्रपती संभाजी नगर कडून येणाऱ्या संशियत वाहनाची तपासणी केल्यानंतर त्यात गांजा असल्याचे दिसून आले. जप्त करण्यात आलेल्या गांजाजी किंमत तब्बल ९१ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय ट्रकचालकाकडून २२ लाख रुपये किमतीचा ट्रक आणि २ मोबाईल असा एकूण १ कोटी १४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी ( बुलडाणा) अशोक थोरात( खामगाव), उपविभागीय अधिकारी गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात धाडचे ठाणेदार मनिष गावंडे, सपोनि नंदकिशोर काळे, निलेश सोळंके, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, सफौ गजानन माळी, पोहेकॉ शरद गिरी, पंकज मेहेर, एजाज खान, दिपक लेकुरवाळे, राजकुमार राजपूत, पोना अनंता फरताळे, गणेश पाटील,पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, गजानन दराडे, पोकॉ विक्रांत इंगळे, गजानन गोरले, शिवानंद मुंढे, राहुल बोर्डे, विलास भोसले यांनी केली.
पोलिसांना शोधावी लागणार उत्तरे?
स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असली तरी आता मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहेत. कोट्यवधी रुपयांचा गांजा असल्याने याप्रकरणात निश्चीतच "बडा मासा" सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो कोण आहे, गांजा कुठून आणला, कुणाला विकणार होते, जिल्ह्यात हा गांजा खरेदी करणारे कोण कोण होते अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरातून अंमली पदार्थांच्या तस्करीचे समूळ उच्चाटन करण्याची संधी पोलिसांकडे आहे....