BREAKING एसटी बसचा अपघात! समोरच्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पलटी झाली;६ प्रवाशी जखमी; शेगाव वरून शिर्डीला जात होती बस

 
मलकापूर ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) खामगांव आगाराची शेगाव वरून शिर्डी कडे जाणारी बस समोरील वाहणाला वाचवण्याच्या प्रयत्नात डिव्हायडरवर पलटी झाली. या बस मध्ये एकूण ३४ प्रवाशी होते त्यामधील ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगांव जवळील फौजी ढाब्या सामोर आज ,२९ जुलै रोजी सकाळच्या ९.३० च्या सुमारास ही घटना घडली.....
   खामगांव आगाराची बस क्रमांक MH40Y5576 ही बस शेगाव वरून शिर्डी कडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगांव जवळील फौजी धाब्याजवळ बस पलटी झाली आहे समोरून जात असलेल्या वाहणाला वाचवण्याच्या प्रयत्नात ही बस पलटी झाल्याची माहिती मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर यांनी दिली आहे. या मध्ये . शरद बारसू झोपे रा.तळणी, . गोविंद माधवराव भारंबे रा. नरवेल ,
वर्षा माधवराव भारंबे रा. नरवेल, ४माधवराव नारायण भारंबे रा. नरवेल,मंदा पंजाबराव देशमुख रा. वसाडी खुर्द तालुका नांदुरा, ६ वैष्णवी पंजाबराव देशमुख रा. वसाडी खुर्द तालुका नांदुरा असे सहा प्रवाशी जखमी झाले आहे. जखमीवर सामान्य रुग्णालय मलकापूर येथे उपचार सुरू आहे.