BREAKING धक्कादायक! बुलढाण्यात डॉक्टरची गळफास लावून आत्महत्या, सुंदरखेड भागातील काँग्रेसनगर परिसरातील घटना.. 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलढाणा शहरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील सुंदरखेड भागातील काँग्रेसनगर परिसरात सत्यम अपार्टमेंट येथे राहणाऱ्या डॉक्टरने सायंकाळी आत्महत्या केली. पंकज सुभाष शिंगणे (४३ वर्ष) असे आत्महत्याग्रस्त डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. शिंगणे हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुर्वेद विभागात कार्यरत होते. सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. डॉ. शिंगणे यांनी घरी कोणी नसताना गळफास लावला. दरम्यान, सायंकाळी नातेवाईकांनी दरवाजा उघडला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सध्या डॉ.शिंगणे यांचे शव विच्छेदनाचे काम शवगृहात सुरू आहे.