BREAKING खळबळजनक! नवरा कमकुवत म्हणून शेजाऱ्याने घेतला फायदा; ३ वर्षांपासून घेत होता विवाहितेचा उपभोग; "त्या" दिवशी तर तिच्या नवऱ्यादेखत केले पाप! अखेर "असे" फुटले बिंग..

देऊळगाव राजा तालुक्यातील घटना...

 
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेने पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली आहे. माझा नवरा कमकुवत असल्याने शेजारी राहणारा ३ वर्षांपासून बळजबरीने लैंगिक अत्याचार करीत असल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध गेला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार घटना देऊळगाव राजा तालुक्यातील एका गावातील आहे. घटना लैंगिक अत्याचाराची असल्याने पिडीत महिलेचे नाव याठिकाणी प्रकाशित करता येत नाही. शिवाय आरोपी देखील महिलेच्या घराशेजारी राहणार असल्याने ते देखील छापता येणार नाही. मात्र घडलेली घटना अतिशय धक्कादायक आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार महिलेचा नवरा कमकुवत आहे. याचाच फायदा घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने घेतला. गेल्या ३ वर्षांपासून तो बळजबरी लैंगिक अत्याचार करीत असल्याचे विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी आतापर्यंत महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. 
या प्रकरणातील पिढीत महिला ही अनुसूचित जातीची आहे. त्यामुळे मुद्दामहून आरोपी हे कृत्य करीत असल्याचा आरोपही महिलेने केला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता आरोपी महिलेच्या घरात घुसला. त्यावर विवाहितेच्या पतीने विचारणा केली असता, ३ वर्षापासून मी "त्या" कामासाठी येतोय, आताही "त्याच" कामासाठी आल्याचे आरोपीने सांगितले. विवाहितेच्या नवऱ्याला शिवीगाळ केली आणि थेट तिच्या नवऱ्या देखत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.
  याच वेळी आरोपीचा आणखी एक साथीदार तिथे आला. त्यानेही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने कशीबशी आरोपींच्या तावडीतून सुटका करून घेतली. घराशेजारी राहणारा आरोपी हा गेल्या तीन वर्षांपासून अधून मधून लैंगिक अत्याचार करीत आहे असेही पीडित विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे.