BREAKING खळबळजनक..! जिल्ह्यात पुन्हा एक मर्डर, शेगावातून किडनॅप केलेल्या चिमुकल्या क्रिष्णाचाही खून! जिल्ह्यात दोन दिवसांत दोन चिमुकल्यांची हत्या...

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंबाशी येथील दहा वर्षे चिमुकल्याचे अपहरण करून खून केल्याची घटना ताजी असतानाच शेगाव तालुक्यातही तशीच घटना घडली आहे. कालच बुलडाणा लाइव्ह ने क्रिष्णा कऱ्हाळे याच्या अपहरणाचे वृत्त प्रकाशित केले होते. आज,२५ जुलैला त्याचा मृतदेहच भास्तन येथील जंगलात आढळला आहे. याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तिघा संशयीतांना ताब्यात घेतली आहे. चिकमुल्या कृष्णाची हत्या का झाली याचे कारण अद्याप समोर आली नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचली असून पंचनामा सुरू आहे.