BREAKING मोताळा तालुका पहाटेच हादरला! चिंचपूर येथे एकाचा डोक्यात लाकूड घालून खून...नेमकं काय घडलं? वाचा...
प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास चिचपूर येथे ही घटना समोर आली. अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून शेख नईम यांच्या डोक्यात लाकूड मारल्याने त्यांना गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रवाना केला. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, जुने भांडण किंवा अन्य कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. तपासानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे चिचपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बोराखेडी पोलिस पुढील तपास करत आहेत.