भरधाव बोलेरोची दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी...
मिळालेल्या माहितीनुसार, शेलापूर येथील सुरेश भोपळे (वय ४५) हे दुचाकी क्र. एमएच २८ डब्ल्यू ३४६१) ने मलकापूरहून आपल्या गावाकडे जात होते. त्याचवेळी मलकापूरकडून येणाऱ्या बोलेरो (क्र. एमएच २८ एच ९०७६) चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत दुचाकीला जबर धडक दिली.
धडकेमुळे सुरेश भोपळे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तत्काळ मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पत्रकार विलास खर्चे, सुहास नारखेडे, राहुल पाटील, सोहम पाटील आदींनी मदतकार्य करत जखमीला रुग्णालयात पोहोचविले.
दरम्यान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर व अॅड. हरीश रावळ यांनी रुग्णालयात भेट देत जखमीची विचारपूस केली. भोपळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव (खां) येथे हलविण्यात आले आहे.