लोणारमध्ये मृतदेह आढळला! गुप्तांगावर जखमा; कारण काय?

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणारमध्ये एक पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. काही वेळानंतर या मृतदेहाची ओळख पटली..प्रभू जाधव (रा.लोणार) यांचा मृतदेह असल्याचे समोर आले असून त्यांचे वय अंदाजे ५५ वर्षांचे होते.
प्राप्त माहितीनुसार काल,२८ डिसेंबरच्या संध्याकाळी ही घटना उजेडात आली. लोणार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाच्या गुप्तांगावर जखमा दिसत होत्या, मात्र असे असले तरी हा खून आहे की दुसरेच काहीतरी कारण या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत..प्रकरणाचा तपास लोणार पोलिसांकडून सुरू आहे.