देऊळगाव राजात रक्तपात! 
८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला; नात्यातील चौघांविरोधात गुन्हा

 

 देऊळगावराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – शहरातील संजयनगर परिसरात घरगुती वादातून एका ८० वर्षीय वृद्धावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी वृद्धाचे नाव मुंगनाथ भिमा शिंदे (वय ८०) असून, त्यांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा नातेवाईक भावेश विजय शिंदे याने डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले.
तसेच विजय मुंगनाथ शिंदे, रंजूबाई विजु शिंदे, आणि आकेश विजय शिंदे (सर्व रा. संजयनगर) यांनी मिळून चापटा-बुक्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे.